Friday, June 18, 2010

Engineering.. काही आठवणी..

२००१ चा सप्टेम्बर महिना... पुण्यात माझ पहिलं पाऊल पडलं ते विश्रांतवाडीत, नाव फारच विचित्र वाटल, पण नंतर 'हड पसर', 'स्वारगेट' अशी नाव ऐकल्यावर हे नॉर्मल वाटल, असो!!... दादानी सांगितलेला पत्ता मी ऑटोवाल्याला दिला, पण त्यांनी मला एका भलत्याच सोसायटी च्या गेट वर सोडून धूम ठोकली.. मी ऑटोतून उतरलो तेव्हा 'दोन मोठ्या suitcase आणि भली मोठी गादी घेऊन' माझा अवतार फारच वाईट होता, आईनी सुद्धा एवढी मोठी गादी पाठवली, की जणू पुण्यात गाद्यांचा दुष्काळच आहे, सकाळचे जेमतेम 9 वाजले होते.. सोसायटीच्या गेटवरचा वॉचमन मला असा ताडत होता जसं सामान मी कुठून चोरूनचं आणलय... मी त्याला गादीमध्ये बॉम्ब नाही याची खात्री पटवून दिली आणि गादी गेटजवळ ठेवून दादाशोध सुरु केला... त्या काळी mobile हा प्रकार आमच्याकडे नसल्याने माझी बरीच वाट लागली , कुठेच दादाचा पत्ता लागत नसल्याने मी शेवटी धाडस करून, 'दार उघड' असलेल्या एका flat मध्ये शिरलो आणि त्यांना दादाला फोन लावून मागितला, त्यांचा रुपात मला देवच भेटला... पहिल्याच अनुभवातून पुणे काही सोपे नाही याची थोडी जाणीव झाली, पुढे भाड्याने flat घेतला आणि आमचा engineering कॉलेजचा पहिला दिवस उगवला, कॉलेज बाहेरून दिसायला छान होत, कारण अजून आतल्या राक्षसी प्रवृत्तींची मला कल्पना नव्हती, कॉलेज मध्ये सगळे इंग्रजी बोलत असल्याने मी जरा बिचकून होतो, सिनेमात 'फक्त' पाहिलेल्या इंग्रजी शिव्या इथे 'मुली' सर्रास देत होत्या... घाबरतचं मी आपली कोपर्यातली जागा पकडली आणि engineering नावाच्या ट्रेन मध्ये बसलो. नवीन ओळखी झाल्या, कळलं की दुरून दुरून मुलं शिकायला आलीत, तो हिंदी डायलॉग आठवला "मौत भी कीस कीस को कहा कहा से खीच के लाती हैं"... lectures, practicals, submissions, M1,Mechanics असे जीवघेणे शब्द कानी पडायला लागले. ह्या सगळ्यात आमचं बसायचं, झोपायचं, जेवायचं आणि नाईट मारायचं ठिकाण म्हणजे आमच प्रिय हॉस्टेल... माझ्या सारख्या हॉस्टेल वर पडिक असलेल्यांना parasite म्हणतात हेही नवीन कळलं, आमच्यासारख्यांची कुठलीही एक रूम नसते, सगळ हॉस्टेल आमचंच समजून कुठेही झोपायचो... lecture bunk करून दुपारी झोपणे संद्याकाळी उठून बन मस्का अन दूध, रात्री कोणाच्या तरी रूम वर मैफिल, पूर्ण हॉस्टेलला ऐकू येईल अशा आवाजात गाणे, आणि मग अभ्यास करत झोपी जाणे, सकाळी पुन्हा आंघोळ करायला स्वच्छ बाथरूम शोध... हॉस्टेलची आणखीन एक खासियत म्हणजे इथला डब्बा, त्या डब्याच्या वरणात रोज नवीन प्रकारच्या झाडांची पानं दिसायची, आमच्यातला एखादा जो महाग डबा बोलवायचा, त्याच्या डब्यातही सगळे जण 'फक्त taste करायला म्हणून' तोंड मारायची आणि ते पोर उपाशी राहायचं... आमचा प्रवास मस्त सुरु झाला होता, सगळेच तसे मित्र होते पण तरी कॉलेज मध्ये, local आणि हॉस्टेलाईट असे दोन नकळत group पडले होते, आणि त्यातल्या त्यात आमचा group म्हणजे professors च्या डोळ्यात सदा खटकणारा... आमचा एकदम झकास group झाला होता, तसं पूर्ण होस्टेलच ओळखायच पण तरी आमचा एक १५ जणांचा group खास होता... प्रत्येक क्लास मध्ये आमच्या पैकी कोणीच पहिल्या ३ बेंचेस वर नव्हत बसत, आमची engineering पूर्ण होई पर्यंत कोणत्याही professor नी आम्हाला ओळखू सुद्धा नये हीच इच्छा असायची, पण तरी आमचं सुख त्यांना कधीच बघवलं नाही. आमच्यातला प्रत्येक जण आपलं डोक engg subjects पेक्षा आपापल्या आवडीच्या क्षेत्रात वापरण्यात फार इच्छुक होतं. असाच माझा एक मित्र रवी, याला का कुणास ठाऊक पण इंग्लिश dictionary च वेड होत, ग्राफिक्स पासून electrical पर्यंत प्रत्येक lecture ला हा पठ्ठ्या लास्ट बेंच वर बसून vocab practice करायचा, एक दिवस विनाकारण याच्या जीवावर उठून ग्राफिक्स च्या lecture मध्ये त्याच्या वही मध्ये आमचे सर डोकावले आणि त्याची पूजा करायला त्याला समोर घेऊन गेले, पुढचे १५ मिनिट सरांनी त्याला तू या जगात येऊन किती मोठी चूक केली ते मराठीत मनसोक्त पटवून दिलं, इतक सगळ बोलून याच्या चेहर्यावरची रेघ सुद्धा बदलत नाही हे पाहिल्यावर ते आणखीन भडकले आणि त्याच्या जवळ जाऊन ओरडायला लागले, हे सगळ अंगावर येत आहे हे पाहून आमचा रवी हळूच म्हणाला, "सर i dont understand Marathi", पूर्ण क्लास पोट धरून पोटातच हसला... पोरांची डोकी सुद्धा अजब होती, कोणी हातात दिवसभर पुस्तकं घेऊन फिरायची पण result आला की "गम" मे हातात बाटली, तर कुणी पुस्तक हातात न घेता first क्लास घ्यायचे, आमच्या group मध्ये जवळपास सगळेच ४० च्या race मध्ये लागले असत, बास ४० मिळाले की देव पावला, ४१ आले तर first क्लास चा आनंद, आणि चुकून ५० च्या वर आले तर university top केल्यासारखे छाती ठोकून आम्ही फिरायचो. आमची branch जरी इलेक्ट्रोनिक्स असली तरी कोणालाही त्याच्या practical मध्ये उत्साह नसायचा, कुठल्या वायर मध्ये इतका current असेल आणि इतक voltage असेल म्हटलं की आमच्या तोंडावर बारा वाजायचे, एकदा आमच्यातल्या एकाला, सरांनी कुठलस circuit दिलं आणि म्हणाले क्लास ला explain कर, ते कारट म्हणतं, "सर पेहले तो याहासे बिजली बहेगी, फिर वो यु यु होके याहासे जायेगी"; आमच्या सरांनी डोक्याला हात मारला.. आमच्या हिरोनी current आणि voltage असा भेदभाव न करता, सरळसोट बिजली म्हटलं, आणि मग त्याच्यावर बिजली पडली. हॉस्टेल मध्ये संध्याकाळी मस्त वातावरण होऊन जायचं, थंड हवा, नुकतीच झोपेतून उठलेली पाखर रूम्स मधून बाहेर यायची, मग कोणी निवांत कट्ट्यावर बसून गप्पा करत, कोणी चहा प्यायला निघत, कोणी आपल्या डमबेल्स काढून व्यायाम करत, तर कोणी आमच्या श्याम्या सारख फोनला चिकटून तिच्याशी बोलण्यात अगदी रंगून जात, संध्याकाळ अजून एका गोष्टीची आठवण करून देते, ते म्हणजे सिनेमे, हॉस्टेल ला दर तीन महिन्यात एक तरी सिनेमामुळे वेड लागायचं, मग तो 'तेरे नाम' असो वा 'देवदास', RHTDM किंवा स्वदेस, देवदास नंतर तर जणू प्रत्येक गोष्ट चुन्निबाबूच्या भाषेत होत होती, द से दर्द, द से दुनिया, द से दोस्ती भी होती हैं रे आणि मग मोठ्ठा हशा... होस्टेल असो किंवा आमचा flat, परीक्षेच्या आधी सगळेच तहान भूक विसरून अभ्यास करायचे, रात्रीचे दिवस आणि दिवसाची रात्र व्हायची, मग ते exam आणि oral चे दिवस आणि मग यायचा नको असलेला result चा दिवस, आम्ही सगळे result च्या आदल्या दिवशी रात्रभर जगायचो, जणू उद्या मरण आहे अश्या भावनेनी, हव ते खायचं, हवा तो सिनेमा आणून बघायचा, ती रात्र म्हणजे जणू वादळापूर्वीची शांतता असायची, जसा जसा result चा तो वेळ किंवा काळ जवळ यायचा आम्ही एकमेकांना आधार देत "मेरा रंग दे बसंती चोला" गाण म्हणत result रूम कडे जायचो, आणि मग हळू हळू आमच्या त्या semister ची पापं उघड्यावर यायची. पण ते दुख किंवा सुख खूप वेळ टिकणार नसायचं, कारण तिथे कुणाला कधीही दुखी राहू न देणारे "मित्र" होते.. हळू हळू दिवस जात गेले engineering झेपायला लागल म्हणा किंवा पास व्हायची कला आम्हाला अवगत झाली म्हणा, पण हो हो नाही नाही म्हणता म्हणता आम्ही engineer झालो, खूप यातना झाल्या, बाकी universities सारख भरभरून percentage नाही आल, पण या काही वर्षांनी खुप काही दिलं, सगळ्यात महत्वाच म्हणजे चांगले मित्र, आणि कुठल्याही परिस्थितीत लढायची ताकत. कुठलीही गोष्ट आम्हाला आयती नाही मिळाली, इथे प्रत्येक गोष्ट आम्ही कमावलेली आहे आणि त्याचाच आम्हाला अभिमान आहे. ह्या सगळ्या आठवणी वाचून मनात हसणाऱ्या तुम्हा सगळ्यांसाठीचं होता हा लेख. विसर पाडू नये म्हणून माझ्या काही लिहून ठेवलेल्या आठवणी.. Engineering च्या.. . रोहण गावंडे

14 comments:

Kapil said...

blog post आवडला.

पण तुझ्या आठवणीन मध्ये तू राजेना विसरला . कधी वेड मिळाला कि त्यांच्या वर हि एखादा छोटासा blog लिहिशील. वाचायला खूप मजा येयील.

Unknown said...

Mast ahe re.. khp aavdla.. Junya changlya aathvani tajya zalya... ekdum sahi ahe...

Rohan Gawande said...

@Kapil: Jarur "Raje" war mi ek blog lihil...
@Sar: Thanks a lot and welcome, whats your real name?

Rohan - Smiles to go before i sleep :-) said...

awesome writeup..truly made me nostalgic..though joined u guys 1 year late but still enjoyed a lot...ani Kapil chi iccha purna zalich pahije :):)

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
richa said...

dada blog wachla khoooop chan lihlas..... majha bahu asunahi ya saglya goshin pasun me anabhidnya hote.. kadhi wel milala tar basawuya ki mehfil .. mala hi kalu det majhya bhawache engg che divas ... ha blog tar ek chotishi jhalak asel he mala hi mahit ahe re.....

rOHIT said...

aaplyala aawadali bhava.....

Ketan said...

wachun mast watla re....

govind said...
This comment has been removed by the author.
govind said...

झकास!!!!!

आज फिर से वो शाम आ गयी....

Engineering म्हणजे काय मित्रा:?

"वेड, 1st day ला घरच्यांच्या आठवणीने रडायला लावणारे वेड, gathering ला बेम्बिपासून ओरडायला लावणारे वेड, college वर मनापासून प्रेम केलेले वेड , कोणाच्या तरी आठवणीने शांत करायला लावणारे वेड , आणि सगळ्यात शेवटी college सोडताना हे दिवस पुन्हा येणार नाहीत , या विचाराने छाती फुटे पर्यंत रडायला लावणारे वेड "

गोविंद जाधव -अभियंता

Rohan Gawande said...

Thank you all for the comments.. :)

Anurag Khandekar said...

Rohan it was a mesmerizing blog i haven't read a blog so lively, in the recent times, your entire life in engineering was evident through your words, i was reminded of my fateful engineering days! Kudos to you for the excellent work!
All the best

Unknown said...

Rohana khup bhavnik jhalo blog baghun. Khup athvani ujalya dolya samor. Kahi tari harvalya sarkha vatat ahey. Chan lihile ahes. Asecha lihit raha. Thoda shabda kosh ankhi vadhav. Changla lekhak hoshil. Dhanyavad.

Rohan Gawande said...

Thanks Padya 😊